रुग्णालयातील सोनोग्राफी बंद, महिलांना भुर्दंड
सोलापूर, दि. 21, सप्टेंबर - पालिका आरोग्य विभागातील दाराशा मदर तेरेसा प्रसूतिगृहातील सोनोग्राफी सेंटर, एक्सरे मशीन बंद असल्यामुळे परिसरातील महिलांना आर्थिक भूर्दंड बसत आहे. रुग्णांना हेलपाटे मारावे लागत असून खरेदीविना नवीन मशीनची प्रक्रिया अपूर्णच आहे. पालिका आरोग्य विभागांतर्गत साधारणपणे प्रसूतिगृहे आहेत. डफरीन चौकातील मदर तेरेसा प्रसूतिगृहात मोफत सोनोग्राफी केली जाते. त्यामुळे गरजू महिलांना त्याचा अनेक वर्षापासून लाभ होत आहे. येथील मशीन 25 वर्षांपूर्वीची आहे. जुलैपासून महिन्यापासून सोनोग्राफी मशीन बंद असल्याने अनेक महिलांना वारंवार पुन्हा येण्यास सांगितले जात आहे. महिन्याकाठी मदर तेरेसामध्ये 100 ते 150 सोनोग्राफी केल्या जातात. सोनोग्राफी केंद्रच बंद असल्याने रुग्ण महिलांना सिव्हिल अथवा खासगीत जाऊन सोनोग्राफी केली जात आहे. त्यामुळे खासगीमध्ये सर्वसाधारणपणे 1000 ते 1500 रुपये मोजावे लागतात. सिव्हिलमध्ये गेल्यास महिन्याची तारीख दिल्याने अडचण निर्माण होत आहे. पालिका प्रसूतिगृहामध्ये भावनाऋषी दाराशामधील सोनोग्राफी सेंटर बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. दाराशा हॉस्पिटलमध्ये एक्सरे मशीन आहे, परंतु फिल्म धुण्यासाठी केमिकल नसल्याने एक्सरे काढले जात नाही. नवीन मशीन घेणार मदरतेरेसाप्रसूतिगृहातील सोनोग्राफी मशीन दुरुस्ती होऊ शकत नाही. त्यामुळे टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यानुसार महिन्याभरात सोनोग्राफी मशीनची खरेदी होईल.’’ डॉ.जयंती आडके, आरोग्य अधिकारी