Breaking News

नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नाशिक, दि. 21, सप्टेंबर - गंगापूर धरण परिसरात झालेल्या पावसामुळे आज सकाळी सात वाजेपासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून नदीकाठच्या गावांना  प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळी सात नंतर विसर्ग अकरा वाजेच्या सुमारास वाढविण्यात आला. आता गंगापूर धरणातून 7742 क्युसेस च्या प्रवाहाने पाणी गोदावरीत प्रवाहित आहे. होळकर  पुलावर पाण्याचे प्रमाण वाढले असून नदीकाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
नांदूरमध्यमेश्‍वरमधून 8731 क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. पालखेडमधील विसर्ग कमी करण्यात आला असून सध्याच्या स्थितीत पालखेडमधून 866 क्युसेस  पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
दारणा आणि कडवा धरणातून अनुक्रमे 4316 आणि 2938 क्युसेस पाण्याचा विसर्ग होतो आहे. गोदावरीला आलेल्या पुरामुळे जायकवाडी धरणसाठ्यात वाढ झाली  असून सकाळी आठ वाजेच्या सुमारास जायकवाड़ी धरणाची पाणी पातळी 1519.90 फुट एवढी होती.
जायकवाडीत गेल्या 24 तासातील पाणी आवक 15.05 दलघमी (0.53 टी.एम.सी.) एवढी म्हणजेच 6155 क्युसेक एवढी आहे.जायकवाडीच्या पाण्यात 1 जुन  2017 पासुन एकूण आवक 65.72 टी.एम.सी. झाली आहे. पहिल्यांदाच जायकवाडी धरण एवढे भरले असून जायकवाडी धरणक्षेत्रात जर पावसाची संततधार सुरूच  राहिली तर जायकवाडीतून विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे.