Breaking News

भारत-ऑस्टेलिया क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणा-या दोघांना अटक

ठाणे, दि. 24, सप्टेंबर - भारत-ऑस्टेलिया झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यादरम्यान सट्टा लावणा-या दोघांना ठाणे पोलिसांनी अटक केली. परेश मानेक आणि हरेश ठक्कर अशी अटक करण्यात आलेल्या सट्टेबाजांची नावे आहेत. पोलिसांनी या दोघांकडून दोन मोबाईल आणि एक वाहन जप्त केले आहे. भारत  ऑस्टेलिया क्रिकेट सामन्यावर कासारवडवली भागात काही सट्टेबाज सट्टा लावत असल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर  पोलिसांनी येथील एका हॉटेलवर धाड टाकून या दोघांना अटक केली.