Breaking News

राज ठाकरेंची व्यंगचित्रातून पंतप्रधानांवर टीका

मुंबई, दि. 24, सप्टेंबर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पेज लाँच केल्यानंतर दुस-याच पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यंगचित्र  काढून भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले आहे. या व्यंगचित्रात कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम पंतप्रधान मोदी यांना भारतात खेचून आणत असल्याचे दिसत आहे.  मात्र दाऊदला मी फरफटत आणल्याचे मोदी जनतेला सांगत आहेत, एक ‘तर्क’चित्र असे लिहित हे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी काल रात्री उशीरा आपल्या फेसबुक  पेजवर प्रसिद्ध केले आहे. ‘दाऊद इब्राहिमला स्वतःहून भारतात येण्याची इच्छा आहे. त्यासाठी तो केंद्र सरकारसोबत सेटलमेंट करण्याच्या तयारीत आहे’ असे राज  ठाकरे यांनी फेसबुक पेजच्या लाँचिंगवेळी म्हटले होते.