Breaking News

तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ

उस्मानाबाद, दि. 15, सप्टेंबर - महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या नवरात्राआधीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला. भवानीमातेची निद्रा ही 21 सप्टेंबरला  होणार्‍या घटस्थापनेपर्यंत पर्यंत सुरू राहणार आहे. 
नवरात्रोत्सवापूर्वी भाद्रपद वद्य अष्टमी ते अश्‍विन शुद्ध प्रतिपदेपर्यंत तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा ही मंदिरातील शेज घरात सुरू असते. देवीची मूर्ती विधिवत पूजा  करून शेज घरातील चांदीच्या पलंगावर निद्रिस्त केली जाते. साडेतीन शक्तीपीठांपैकी ही एकमेव चलमूर्ती आहे.
.देवी शारदीय अश्‍विन नवरात्रा आधी आठ दिवस चांदीच्या मंचकावर निद्रा घेते. शारदीय अश्‍विन नवरात्रानंतर,पाच दिवस माहेरच्या चंदनाच्या,पलंगावर विश्रांती निद्रा  घेते आणि शाकंभरी पौष नवरात्री दरम्यान देवी आठ दिवस चांदीच्या मंचका वर निद्रा घेते .अशा अवघ्या विश्‍वाचा भार सोसुन विसावा घेण्यासाठी आई गादीवर असते  म्हणुन तमाम देवी भक्त तथा देवीचे आराधी देवीच्या या निद्राकालात गादी ,उशी, तक्क्या यांचा त्याग करतात उपवास धरतात.
तुळजाभवानी मंदिरात आता बयोमेट्रिक प्रवेश सुरू झाले असल्याने दर्शनात सुलभता आली आहे.