Breaking News

यावर्षी काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा - राजनाथ सिंग

श्रीनगर, दि. 12, सप्टेंबर -  मागील वर्षापेक्षा यावर्षी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीत सुधारणा दिसून येत आहे, असे वक्तव्य आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग  यांनी केले. पर्यटकांनी काश्मीरमध्ये येण्यासाठी सज्ज व्हावे. काश्मीरी जनता तुमच्या स्वागतासाठी तयार आहे, असे आवाहन सिंग यांनी केले. सिंग यांनी या वेळी  पाकिस्तानला घुसखोरी थांबविण्याचा सल्ला दिला. त्या नंतर थोड्याच वेळात पाकिस्तानने आज सिमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. काश्मीर प्रश्‍नावर कायमस्वरूपी  तोडगा काढण्यासाठी दयाभाव, संवाद, सहअस्तित्व, आत्मविश्‍वासाची निर्मिती आणि सातत्य असावे असेही ते म्हणाले.