प्रवाशांकडून टीप, खाद्य पदार्थांवरील ज्यादा पैसे आकारणे बंद करण्याचे रेल्वेमंत्र्यांचे आदेश
नवी दिल्ली, दि. 12, सप्टेंबर - पुढील 48 तासात रेल्वे प्रवाशांकडून स्विकारल्या जाणा-या टीप व खाद्यपदार्थांवर ज्यादा पैसे घेणे बंद करण्याचे आदेश रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वे कर्मचा-यांना दिले आहेत. विभागीय रेल्वे केंद्रांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे काटेकोर पालन न झाल्यास मोठ्या प्रमाणावर दंड आकारला जाणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीवर खानपान निरीक्षक सोमवारपासून लक्ष ठेवणार आहेत. यासाठी सोशल मीडियाचा वापरही केला जाणार आहे.