भारतातील शाळाही मुलांसाठी सुरक्षित राहिलेल्या नाही - कैलाश सत्यार्थी
नवी दिल्ली, दि. 12, सप्टेंबर - नोबेल पुरस्कार विजेते समाजसेवक कैलाश सत्यार्थी यांनी गुरुग्रामच्या रेयान इंटरनॅशनल स्कूल व दिल्लीतील टागोर पब्लिक स्कूलमधील घटनांचा निषेध केला आहे. आता भारतातील शाळाही मुलांसाठी सुरक्षित राहिलेल्या नसून शाळांच्या सुरक्षा उपाययोजनांचे कठोर पुनरावलोकन करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
मी मुलांनी शाळेत जावे यासाठी कायम आग्रही असतो. शाळा मुलांसाठीचे सर्वात सुरक्षित ठिकाण असल्याचे मी मानत होतो. परंतु सध्याच्या घडामोडी पाहता आपली मुले आता शाळेतही सुरक्षित नसल्याचे म्हणावे लागेल. आपण आपल्या मुलांना सुरक्षित वातावरण देण्यास अपयशी ठरलो आहोत, असे ते म्हणाले. सध्याच्या या घटनांमुळे बालक व पालक दोघांच्याही मनात शाळांबाबत भीती निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले. मी नुकतीच एका बलात्कारीत विद्यार्थीनीची भेट घेतली होती. शाळेतून घरी परतत असताना तिच्यावर बलात्कार झाला होता. त्यामुळे मी शाळेत जाण्याबद्दल काही बोलल्यास ती भीतीने कापायची. अशी स्थिती अनेकांची आहे. पालकही आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायला घाबरत आहेत. ही अतिशय लज्जास्पद बाब आहे, असे त्यांनी सांगितले.