प्रद्युम्न हत्या प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाची केंद्र , हरियाणा सरकारला नोटीस
नवी दिल्ली, दि. 12, सप्टेंबर - प्रद्युम्न ठाकूर हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि हरियाणा सरकारला नोटीस बजावून तीन आठवडयांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभाग, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ आणि रेयान इंटरनॅशनल स्कूलला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. प्रद्युम्न हत्येप्रकरणी सीबीआयद्वारे चौकशी व्हावी, या मागणीसाठी प्रद्युम्नचे वडिल वरूण ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागतली होती. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
दरम्यान, आज या प्रकरणी शाळा व्यवस्थापनेच्या दोन वरिष्ठ अधिका-यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे समजते.
दरम्यान, आज या प्रकरणी शाळा व्यवस्थापनेच्या दोन वरिष्ठ अधिका-यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे समजते.