Breaking News

खामगावमध्ये इकाफ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा इनरव्हील क्लबचा उपक्रम

बुलडाणा, दि. 01, सप्टेंबर - इनरव्हील क्लब खामगावने शाडू मातीपासून इकोफ्रेंडली गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा नंद टावर येथे अमोल इन्फोटेकच्या  हॉलमध्ये घेतली.
यावेळी सौ. कल्याणी हाडे, ह्यांनी शाडू मातीपासून सुंदर गणेश मुर्त्या बनविणे शिकविले. तसेच गोपीचंदन, हळद, कुंकु व अष्टगंध रंगासाठी वापरले. रंगही  इकोफ्रेंडलीची वापरण्यावर भर दिला. क्ल्बच्या अध्यक्षा आर्कि. सौ. सारिका न वघरे ह्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत क्लबच्या बहुतांश महिलांनी भाग घेऊन  मुर्त्या बनविल्या व स्वत: बनविलेल्या बाप्पाचीच स्थापनाही केली. ह्या कार्यशाळेच्या प्रचार व प्रसारासाठी देण्यासाठी म्हणून चिन्मय स्कूल व रोटरी क्लब खामगांव  सोबतच इनरव्हील क्लबनेही सायकल रॅली व इकोफ्रेंडली गणेशमूर्ती स्थापनेवर आधारीत स्कीट प्ले द्वारे प्रबोधन केले. सदर रॅली 12 ऑगस्टला नॅशनल स्कूलच्या  प्रांगणात व चौका चौकात नेण्यात आली होती. या कार्यशाळेद्वारे न विरघळणार्या पि.ओ.पी.च्या भारातून वसूधरेचा मुक्त करुन तिचे संवर्धनात एक प्रकारे हातभार  लावला. या उपक्रमात इनरव्हील क्ल्ब सदस्या तसेच इतर महिलांनी व मुलांनी भाग घेतला. अशी माहिती प्रसिध्दी प्रमुख सौ. शीतल मोदी यांनी एका प्रसिध्दी  पत्रकाद्वारे दिली.