Breaking News

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमिवर सातार्‍यातील 39 जण तडीपार

सातारा, दि. 01 (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी सातार्‍यातील 39 जणांना 6 दिवसांसाठी तात्पुरते तडीपार  करण्यात आले असून यामध्ये स्वीकृत नगरसेवकासह गुंडांचा समावेश आहे. पोलीस उपअधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांनी हे आदेश काढले आहेत.
सातारा शहर पोलीस ठाण्याअंतर्गत तात्पुरत्या तडीपारीमध्ये 10 जणांचा समावेश असून त्यामध्ये अजय राठोड, प्रशांत किर्तीकुडाव, चेतन सोळंकी, रवि सोळंकी,  चेतन पवार, विजय अवघडे, संजय माने, अमोल जाधव, संकेत राजे, योगेश शिंदे यांचा समावेश आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यातअंतर्गत सर्वाधिक 21 जणांचा समावेश  असून मनोज घाडगे, गणेश थोरात, अर्शद बागवान, सागर सुर्यवंशी, धंनजय साळुंखे, सुदर्शन उर्फ बल्ल्या गायकवाड, किरण कुर्‍हाडे, सुरज उर्फ भैय्या चौगुले, किरण  आवळे, अमर आवळे, अनिल कस्तुरे, सुजीत उर्फ गुन्या आवळे, गुरुप्रसाद साठे, राजू नलवडे, विजय नलवडे, अतुल चव्हाण, राहूल करवले, शिवाजी अहिवळे,  धीरज ढाणे, सूरज पवार, प्रदीप पवार यांचा समावेश आहे. यातील अतुल चव्हाण हे सध्या स्वीकृत नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. सातारा तालुका पोलीस  ठाण्याच्या हद्दीतून 8 जणांना तडीपार करण्यात आले आहे. त्यामध्ये राहूल गंगावणे, बाळू सावंत, सुनील माने, आप्पा उर्फ शिरीष साळुंखे, दिनकर वाघ, तुषार  कापसे, वैभव फाळके यांच्यासह एका महिलेचा समावेश आहे. तिन्ही पोलीस ठाण्यांकडून गेल्या आठ दिवसांपूर्वी तात्पुरत्या तडीपारीचे प्रस्ताव पोलिस उपअधीक्षक  डॉ. खंडेराव धरणे यांच्याकडे पाठवले होते. त्यानुसार त्यांनी सुनावणी घेवून कारवाई केली. संशयितांना दि. 1 ते 6 सप्टेंबरपर्यंत तडीपार करण्यात आले आहे.  संबंधितांनी सातारा शहर, शाहूपुरी व तालुका हद्दीत येण्यास तसेच विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला आहे.