Breaking News

नाशिकचे टोमॅटो शेजारच्या देशात निर्यात करण्याची खा. हरिशचंद्र चव्हाण यांची मागणी

नाशिक, दि. 28, सप्टेंबर - शेजारील देशात भारतीय टोमॅटोला जास्त भाव मिळत असल्याने निर्यातीला परवानगी द्यावी अशी मागणी खा. हरिशचंद्र चव्हाण यांनी  केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू जी यांच्याकडे केली. पिंपळगाव बसवंत परिसरातील शेतकर्‍यांनी दिलेल्या निवेदनात पाकिस्तानात येथील टोमॅटो निर्यात केल्यावर  भाव मिळत असल्याने भारत-पाकिस्तान व्यापारी मार्ग टोमॅटोच्या निर्यातीसाठी खुला करावा अशी विनंती केली होती.
भारत-पाकिस्तान ताण वाढल्याने द्विपक्षीय व्यापार थांबवण्यात आला आहे. परंतु, त्यामुळे टोमॅटोची देशातील सर्वात मोठं उत्पादन करणार्‍या नाशिक जिल्ह्यातील  शेतकर्‍यांना पडलेल्या भावात पिक विकावा लागत आहे. दरम्यान,केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी याबाबत लवकरच विचार केला जाईल आणि संबंधित विषय  मार्ग काढू असे सांगितले.