Breaking News

पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसचे दरवाढ निषेध आंदोलन

नाशिक, दि. 28, सप्टेंबर - पेट्रोल डिझेल दरवाढीच्या नावाखाली लुटणार्‍या सरकारचा नाशिक जिल्हा युवक काँग्रेसतर्फे दरवाढ निषेध आंदोलन करत जाहीर निषेध  करण्यात आला .प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे व नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल दिवे यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन करण्यात  आले .
आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले की, भारतभर पेट्रोल स्वस्त असताना महाराष्ट्रात तब्बल 10 रुपये पेट्रोल दरात लिटरमागे आकारून वाढ  केली आहे दिल्लीत आज 70 रुपये ,चेन्नईत 72रुपये तर कोलकातामध्ये 73रुपये प्रति लिटरने पेट्रोल मिळते मग महाराष्ट्रातच अशी कोणती आणीबाणी निर्माण झाली  आहे ? असेही ते म्हणाले .पंतप्रधान मोदींनी अच्छे दिनचे स्वप्न दाखविले. मात्र, त्यांच्याकडे कुठलाच ठोस कार्यक्रम दिसत नसून जनता तीन वर्ष थांबूनही उपयोग  झालेला नसल्याचेही तांबे म्हणाले .या प्रसंगी निरीक्षक खान, नगरसेवक राहुल दिवे,युवक प्रदेश सरचिटणीस स्वप्नील पाटील ,नगरसेविका वत्सला खैरे, भारत  टाकेकर, बबलू खैरे आदी उपस्थित होते.