Breaking News

महिलांच्या लोकसभा व विधानसभेतील आरक्षणासाठी स्वाक्षरी मोहिम

लातूर, दि. 27, सप्टेंबर - महिलांना लोकसभा व विधानसभेत 33 टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वतीने स्वाक्षरी अभियान  राबवण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून लातूर तालूका महिला काँग्रेसच्या वतीने ग्रामीण भागात स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. या अभियानात  महिला आरक्षणा समर्थनार्थ तीन हजार महिलांच्या स्वाक्षरी घेण्यात आल्या. महिलांच्या स्वाक्षरींचे हे निवेदन प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस  यांच्याकडे पाठवण्यात आल्याची माहिती लातूर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सुनिताताई आरळीकर व लातूर तालूका महिला काँग्रेस अध्यक्षा दैवशाला राजेमाने यांनी  दिली.
लोकसभा व विधानसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळावे यासाठी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या वतीने सह्यांची मोहिम राबवण्यात येत आहे. महिलांच्या  आरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील भाजपाच्या बहुमताचा उपयोग महिला आरक्षण लागू करण्यासाठी करावा असे निवेदन अखिल भारतीय काँग्रेस  पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनीया गांधी यांनी पंतप्रधानांना दिले होते.