Breaking News

निर्वस्त्र छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देवून पतीनेच केला पत्नीचा छळ

बीड, दि. 27, सप्टेंबर - पत्नीचे निर्वस्त्र फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून पतीनेच पत्नीचा छळ केल्याचा गुन्हा तक्रारी दाखल करण्यात आला आहे. एका  तरूणीचा विवाह खालापूरी येथील युवकाशी झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी पतीने दोघांतील शारीरिक संबंधाचे चित्रीकरण केले नंतर आता ते चित्रीकरण  व्हायरल करण्याची धमकी देवून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ सुरू केला. त्याचे या पुर्वी एकदा लग्न झाले असून त्याची माहितीही लपवून ठेवण्यात आली  होती. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.