Breaking News

माहिती अधिकार आठवडा निमित्ताने विशेष मोहिम

औरंगाबाद, दि. 27, सप्टेंबर - माहिती अधिकार दिवस 29 सप्टेंबर, 2017 आणि माहिती अधिकार आठवडा -29 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या निमित्ताने जास्तीत  जास्त माहिती अधिकाराची व्दितीय अपील प्रकरणे सुनावणी घेऊन निकाली काढण्यासाठी राज्यभरात एक विषेश मोहिम आखण्यात आली आहे. दि. 29 सप्टेंबर ते  6 ऑक्टोंबर 2017 ’माहिती अधिकार’ आठवडा निमित्ताने औरगाबाद जिल्हृयातील व्दितीय अपीलांवर सुनावणी घेण्यात येणार आहे. येथील औरंगाबाद खंडपीठाकडे  मराठवाडा विभागातील जवळपास 6500 प्रकरणे प्रलंबित असून दि. 25 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर, 2017 या कालावधीत औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील  जवळपास 1200 प्रकरणे सुनावणी साठी ठेवण्यात आली आहेत.