प्रशासनाच्या धडक कारवाईने प्राथमिक शिक्षकांमध्ये खळबळ
नाशिक, दि. 21, सप्टेंबर - विविध कारणांनी गैरहजर असलेल्या परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांविरोधात शिक्षण विभागाने धडक मोहीम उघडली असून 26 शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. सतत गैरहजर राहणार्या पाच शिक्षकांवर बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे. दोन शिक्षकांवर बडतर्फचा प्रस्ताव ठेवण्यात असून 11 शिक्षकांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे.दोन शिक्षकांचा सक्तीने सेवानिवृत्तीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. प्रशासनाच्या या धडक कारवाईने प्राथमिक शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
शिक्षकांवर हा कारवाईचा बडगा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्या आदेशान्वये उगारण्यात आला आहे. जि.प.चे प्राथमिक शिक्षक वर्षोनुवर्ष गैरहजर होते. तर काही शिक्षकांनी अनेक प्रकारच्या चुका केल्या होत्या. यातील अनाधिकृत गैरहजर राहणार्या शिक्षकांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर वेळात कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, काही गैरहजर शिक्षकांची सन 2001 पासून 2017 पर्यंत चौकशीस विलंब करण्यात आला . चौकशीस विलंब होत असल्याच्या तक्रारी गेल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी तात्काळ खातेनिहाय चौकशी असलेल्या कर्मचार्यांची माहिती मागविली . तसेच शिक्षण विभागातील वर्षोनुवर्ष गैरहजर असलेल्या शिक्षक, खातेनिहाय चौकशी सुरू असलेल्या शिक्षक याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या अहवालाची अंती चौकशी करून मीना यांनी दोषी शिक्षकांवर कारवाई केली आहे. यात सतत गैरहजर असलेल्या 5 शिक्षकांना सेवेतून बडतर्फ केले आहे. दोन शिक्षकांची एक वेचनवाढ तात्तपुरत्या स्वरूपात बंद केली आहे. चार शिक्षकांची दोन वेतनवाढी तर एका शिक्षकांची तीन वेतवाढ बंद केली आहे. एका शिक्षकांला मुळ वेतनावर आणले आहे, दोन शिक्षकांना ताकीद दिली आहे, दोन शिक्षकांना अनाधिकृत गैरहजर कालावधीतील वेतन रोखली आहे. एका शिक्षकाचे सेवानिवृत्ती वेतन कायमस्वरूपी बंद केले आहे. या कारवाई व्यातिरिक्त 2 शिक्षकांचे बडतर्फेचा प्रस्ताव, दोन शिक्षकांची वेतनवाढ बंद करणे, दोन शिक्षकांना सक्तीने सेवानिवृत्त करणे तर दोन शिक्षकावर मुळ वेतनावर आणण्याचा प्रस्ताव आहे. प्रशासनाच्या या धडक कारवाईने प्राथमिक शिक्षकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.