Breaking News

महालक्ष्मी माता मंदिरात सोनवणे यांच्या हस्ते आरती

नवरात्रीत विशेष कार्यक्रमांचे आयोजन, भाविकांची वाढती गर्दी

अहमदनगर, दि. 24, सप्टेंबर - शहरातील माळीवाडा येथील प्राचीन देवस्थान असलेल्या महालक्ष्मी माता मंदिरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज संध्याकाळी दैनिक लोकमंथनचे मुख्य संपादक अशोकराव सोनवणे व सौ. सोनवणे यांच्याहस्ते मंदिरात आरती करण्यात आली. यावेळी सोनवणे यांचा मंदिराचे भगत पोपटराव साठे व देेवस्थानचे अध्यक्ष श्रीकांत साठेे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना सोनवणे यांनी मंदिरातील उपक्रमाचे कौतुक करून भाविकांबरोबर रंजल्या गांजल्याची सेवा हीच खरी ईश्‍वर भक्ती असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी वर्षभर केल्या जाणार्‍या कार्यक्रमाची माहिती घेतली. कार्यक्रमास बाबासाहेब साठे,अण्णा पवार,डी.जी.साठे, मच्छिंद्र साठे, अशिष पारदे,उमेश साठे, रणजित पारदे,प्रतिक साठे, पप्पू पारदे, रविंद्र साठे, विशाल साठे आदी उपस्थित होते. माळीवाडयातील महालक्ष्मी माता मंदिराला प्राचीन इतिहास आहे. कोल्हापुरच्या महालक्ष्मी देवीचे हे ठाणे असल्याचे सांगितले जाते. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. बाबााहेब आंबेडकर हे या मंदिरात आले होते. तेथे त्यांनी दलितांची बैठक घेऊन त्यांना शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा मूलमंत्र दिला होता, असेही सांगितले जाते. सध्या नवरात्रीत मंदिरात अनेक कार्यक्रम केले जात  आहेत. येणार्‍या भक्तांना फराळाची व्यवस्था करण्यात आली  आहे. कीर्तन, भजनाचे कार्यक्रम होत  आहेत. तसेच जागरण, गोंधळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंदिरात पहिल्या दिवशी आमदार संग्राम जगताप,दुसर्‍या दिवशी उपमहापौर श्रीकांत छिंदम यांच्या हस्ते आरती करण्यात आली आहे.