Breaking News

खा. सहस्रबुद्धे, पोपटराव पवार आदींच्या उपस्थित

प्रगत कृषी तंत्रज्ञान केंद्राच्या वस्तूचे लोकार्पण

अहमदनगर, दि. 24, सप्टेंबर - स्नेहालय आणि सिंजेन्टा फौंडेशन(इंडिया) यांनी उभारलेल्या प्रगत कृषी तंत्रज्ञान केंद्राच्या सुसज्ज वास्तूचे लोकार्पण येत्या बुधवारी, दि.27 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 11.30 वाजता इसळक ग्राम (ता.जी. अहमदनगर) येथे होत आहे. यावेळी खा. विनय सहराबुद्धे( राष्ट्रीय उपाध्यक्ष-भाजपा), प्रकाश आपटे(अध्यक्ष-सिंजेन्टा फौंडेशन इंडिया), पोपटराव पवार(कार्याध्यक्ष-आदर्शगाव समिती, महाराष्ट्र राज्य), बी.टी. शेषाद्री( ज्येष्ठ सल्लागार- सिंजेन्टा फौंडेशन इंडिया) आदि उपस्थित राहणार असल्याची माहिती स्नेहालयाचे राजीव गुजर, संजय गुगळे, अनिल गावडे यांनी दिली. दुष्काळी भागातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील युवकांसाठी हा प्रकल्प एक नवा आशाकिरण ठरल्याचे महेश मरकड यांनी नमूद केले.
गुजर यांनी सांगितले की, कृषिप्रधान भारत देशात शेती आणि शेतकरी यांची अवस्था हा सर्वांचा चिंतेचा आणि चिंतनाचा प्रश्‍न बनला आहे. औद्योगिक क्षेत्रातील महामंदी, निश्‍चलनीकरणानंतर भारतात निर्माण झालेली बिकट रोजगारस्थिती या पार्श्‍वभूमीवर हक्काचा, प्रतिष्ठित आणि शाश्‍वत रोजगार हा तरुणाईचा यक्ष प्रश्‍न बनला आहे. हा संदर्भ लक्षात ठेऊन एक नवी पायवाट आम्ही मळत आहोत. ग्रामीण तरुणाईला कृषी क्षेत्रात रोजगार व व्यवसायाची दर्जेदार संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाचा ‘छरींळेपरश्र खपीींर्ळीीींंश ेष र्ठीीरश्र ऊर्शींशश्रेिाशपीं  झरपलहूरींळ ठरक्ष’ द्वारा पुरस्कृत 45 दिवसांचा पूर्णवेळ निवासी अभ्यासक्रम स्नेहालयमध्ये मागील एक वर्षापासून यशस्वीरीत्या सुरु आहे. -ढ- ( -सीळर्लीर्श्रीींश ढशलहपेश्रेसू -ीीळीींरपीं) हे या अभ्यासक्रमाचे नामनिधान करण्यात आले. श्री. गुगळे यांनी नमूद केले की, त्यामुळे अनेक ग्रामीण युवकांना कृषी क्षेत्रामध्ये रोजगार व्यवसाय विकसित करण्यासाठी तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञान वापरून व्यावसायिक शेती करण्यास चालना मिळाली आहे. या प्रगत कृषी प्रशिक्षण केंद्राच्या नवीन आणि सुसज्ज वास्तूमुळे कृषी आणि ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेला एक क्रांतिकारक दिशा देण्याचा संकल्प आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या मागील वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना नोकरी आणि स्वयंरोजगार यात मोठे यश मिळाले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी 9011114591, 9604040068 या क्रमांकावर संपर्काचे आवाहन संस्थेने केले आहे.