Breaking News

मुस्लिम नागरिकांनी केली गणपतीची आरती

औरंगाबाद, दि. 02, सप्टेंबर - मालेगाव येथे सार्वजनिक गणपतीची आरती केली म्हणून मुस्लिम नागरिकांना पंथातून बेदखल करण्याचा फतवा निघाल्याच्या  पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद येथे गणेश महासंघाच्या कार्यक्रमात मुस्लिम रहिवाशांनी गणपतीची आरती केली हे लक्षणीय उदाहरण ठरले आहे. नवीन औरंगाबाद गणेश  महासंघाच्यावतीने आज सकाळी गणपती बाप्पाची आरती स्थानिक मुस्लिम रहिवाशांच्या हस्ते करण्यात आली. गजानन मंदिरजवळील नवीन औरंगाबाद महासंघाच्या  श्री गणेशाची आरती करुन मुस्लिम समाजाने यावेळी एकतेचा संदेश दिला. यावेळी मुन्शी पटेल, बाबा शेख, हाशम पटेल, मेहबूब भाई बागवान, बदरुद्दीन मामु, शेख  अखील, जावेद खान, नबी पटेल, छोटू पटेल, रहीम पटेल, कादर शहा, अब्दुल रशीद खान, कय्युम पठाण, अब्दुल रजजाक पटेल, शेख साहेबलाल पटेल,  इलियाज पटेल, युसूफ खान, अय्युब हबीब खान, जी.के.शेख सर आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.