Breaking News

धोनी नंतर पी. व्ही. सिंधूच्या नावाची पद्मभूषणसाठी शिफारस

नवी दिल्ली, दि. 25, सप्टेंबर - वर्ल्ड चॅम्पियनशीप रौप्य पदकविजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची शिफारस ‘पद्मभूषण’ सन्मानासाठी करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयाने तिसर्‍या सर्वोच्च नागरी सन्मानासाठी सिंधूच्या नावाची शिफारस केली आहे. काहीच दिवसांपूर्वी धोनीच्या नावाची शिफारस बीसीसीआयने ‘पद्मभूषण’साठी केली होती. यावर्षी धोनीनंतर ‘पद्मभूषण’साठी शिफारस होणारी सिंधू दुसरीच क्रीडापटू ठरली आहे. गेल्या आठवड्यात कोरिया ओपनवर नाव कोरल्यानंतर ही ट्रॉफी पटकावणारी पहिली भारतीय होण्याचा मान तिला मिळाला होता.
टोकियातील जपान ओपन सुपर सीरीजमध्ये सिंधूचं आव्हान दुसर्‍याच फेरीत संपुष्टात आल्यानं तिच्या चाहत्यांची घोर निराशा झाली होती. मात्र अवघ्या 22 वर्षांच्या पीव्ही सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर झेप घेतली.