Breaking News

रणवीर सिंग कपिल देव यांची भूमीका साकारणार

मुंबई, दि. 25, सप्टेंबर - बॉलिवूडमध्ये सध्या क्रीडा विषयावरील चित्रपटांचं वारं वाहू लागल्याचं पाहायला मिळत आहे. भारताच्या पहिल्या क्रिकेट विश्‍वचषक विजेतेपदावर लवकरच चित्रपट तयार केला जाणार आहे. यामध्ये आघाडीचा अभिनेता रणवीर सिंग भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे.
फरणवीर लवकरच सुशांत सिंग राजपूत, फरहान अख्तर, प्रियंका चोप्रा, श्रद्धा कपूर यांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे. धोनी, मिल्खा सिंग, सायना नेहवाल, मेरी कोम, खली यांच्यानंतर आता कपिल देव यांच्यावर चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग हा कपिल देव यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती चित्रपट ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्श यांनी दिली आहे. यापूर्वी कपिल देव यांची भूमिका अर्जुन कपूर साकारणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र तरण आदर्श यांच्या ट्वीटमुळे रणवीरच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. 1983 मध्ये भारताला मिळालेल्या अनपेक्षित विश्‍वचषक विजेतेपदाभोवती या चित्रपटाची कथा फिरते.