Breaking News

द्राक्षांवरील लावलेला आयात कर बांगलादेशाने रद्द करावा- खा. हरिशचंद्र चव्हाण

नाशिक, दि. 28, सप्टेंबर - भारतातून निर्यात होणार्‍या द्राक्ष आणि बेदाण्यावर बांगलादेशात शंभर टक्के आयात कर लावण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय द्राक्ष आणि  बेदाणा तेथील बाजार पेठेत महाग विकला जात आहे. हा आयात कर रद्द करावा यासाठी खा. हरिशचंद्र चव्हाण यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभूजी यांची नवी  दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली. 
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ, पुणे यांनी खा. चव्हाणांकडे निवेदन दिले होते. द्राक्ष उत्पादनात महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर असल्याने या आयात  कराचा फटका राज्यातील शेतकर्‍यांना अधिक प्रमाणात होत आहे. यापुढे दोन देशात होणार्‍या द्विपक्षीय चर्चेत हा मुद्दा उपस्थित करावा, असे खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण  यांनी सांगितले. दक्षिण आशियात मुक्त व्यापार करार व्हावा यासाठी भारत नियमितपणे प्रयत्न करत आहे असे केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.
या बैठकीत खा. हरिशचंद्र चव्हाण यांच्याबरोब ऑल इंडिया द्राक्ष बागायतदार संघ अध्यक्ष जगन्नाथ खापरे, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे कैलास भोसले , महाराष्ट्र  द्राक्ष ार संघाचे खजिनदार महेंद्र शाहीर उपस्थित होते.