Breaking News

राजनाथ सिंग तीन दिवसीय काश्मीर दौ-यावर

नवी दिल्ली, दि. 09, सप्टेंबर - काश्मीर खो-यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग  (शनिवार) पासून तीन दिवसीय काश्मीर  दौ-यावर जाणार आहेत. यावेळी सिंग हे राज्यपाल एन.एन.वोहरा आणि राज्याच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेऊन राज्यातील सुरक्षा स्थितीचा आढावा  घेणार आहेत. तसेच ते जम्मू काश्मीर पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानांशी चर्चा करणार आहेत.
काश्मीर खो-यात सुरू असलेला हिंसाचार आणि फुटीरतावादी नेत्यांच्या घरांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेचे छापे या सर्व घटनेचा आढावा सिंग घेणार असल्याचे समजते.  आपल्या दौ-यादरम्यान सिंग काश्मीर खो-यात शांतता प्रस्थापित करणे आणि राज्यात विकास व कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यावर अधिक भर देणार  आहेत.