नागपूर सेंट्रल जेलमध्ये कैद्याची हत्या; अंतर्गत भांडणात खून झाल्याची माहिती
नागपूर, दि. 12, सप्टेंबर - नागपुरातील कुश कटारिया अपहरण आणि हत्याकांडातील दोषी आयुष पुगलियाची नागपूर मध्यवर्ती कारागृहात हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. कैद्यांमधील अंतर्गत भांडणातून सूरज विशेषराव कोटनाके या कैद्याने आयुषची हत्या केली. मध्यवर्ती कारागृहात झालेल्या या हत्येमुळे पुन्हा एकदा जेलमधील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
यासंदर्भात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार आयुष पुगलिया आणि सूरज कोटनाके यांच्यात गेल्या काही दिवसांपासून भांडण सुरू होते. यातूनच आज,सोमवारी सकाळी सुरजने चमच्याला धार करून बनवलेल्या चाकूने आयुषच्या गळ्यावर वार केले. तसेच फरशीने त्याच्या डोक्यावर प्रहार केला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कारागृह प्रशासनाने आयुषला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.