Breaking News

पुण्यातील भारत-न्यूझिलंड एकदिवसीय क्रिकेट सामन्याची तिकीटविक्री सुरू

पुणे, दि. 30, सप्टेंबर -  गहूंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझिलंड यांच्यात 25 ऑक्टोबर रोजी  एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला जाणार असून या सामन्याची तिकीटविक्री सुरू झाली आहे. या सामन्याचे तिकीटविक्रीचे दर वेस्ट स्ट्ट स्टँडः रूपये  800, साऊथ अप्परः रूपये 1100, साऊथ लोअरः रूपये 2000/, साऊथ वेस्ट व साऊथ ईस्ट स्टँडः रूपये 1750, नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट स्टँडः रूपये  1750, नॉर्थ स्टँडः रूपये 2000, आणि साऊथ पॅव्हेलियन ए आणि बीः रूपये 3500 इतके आहे.क्रिकेटप्रेमींना दोनप्रकारे तिकीट विकत घेता येतील अशी सुविधा  एमसीएने केली आहे. यात ऑनलाईन पर्याय असेल. त्यासाठी ुु.लेेज्ञूीहेु.लेा हे संकेतस्थळ आहे. या शिवाय भांडारकर रोडवरील पीवायसी हिंदू जिमखाना आणि गहुंजे  येथील एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर तिकीट खरेदी करता येील. या दोन्ही ठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत तिकीटविक्रीचे काऊंटर सुरू  राहणार आहेत.महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणारा हा तिसरा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना असून याआधी या  स्टेडियमवर भारताचे ऑस्ट्रेलिया विरूध्द आणि इंग्लंड संघाविरूध्द एकदिवसीय सामना रंगले होते. न्यूझिलंड क्रिकेट संघ याआधी केवळ दोनदा पुणे शहरामध्ये  एकदिवसीय क्रिकेट सामना खेळण्यास आला होता.