Breaking News

पुतळ्याची विटंबना करणार्‍यावर कठोर कारवाई करण्याची मागणी

बुलडाणा, दि. 22, सप्टेंबर - चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणार्‍या आरोपीला कठोर शासन करावे तसेच शिवाजी महाराजांचे  महाराष्ट्रात असलेले सर्व पुतळ्यांच्या संरक्षणासाठी शासनाने पावले उचालावीत अशी मागणी येथील शिवाजीनगर मित्रमंडळाच्या वतीने 19 सप्टेंबर रोजी तहसिलदार  यांचे मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 
निवेदनात नमूद आहे की, महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चिखली येथील पुतळ्याची एका माथेफिरने विटंबना केली असून ही  बाब निंदनीय आहे. तरी यापुढे कोणीही अशाप्रकारचे कृत्य करुन नये यासाठी या आरोपीला कठोर शासन करावे तसेच महाराष्ट्रात सर्वदूर असलेल्या शिवाजी  महाराजांच्या पुतळ्यांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिवाजीनगर मित्रमंडळाचे दिपक  मुंजा, सुधीर घुले, श्रावण पानसरे, राहुल जाधव, निलेश अमराळे, ईवर भदाले, विनायक राजापुरे, विजय गावंडे, भरत गाडेकर, महेश खैरनार, यशवंत थोरबोले,  योगेश सुर्यवंशी, लखन घुले, शेखर गनतिरे, अनिकेत चव्हाण, अनंता देवकर, शुभम सोळंके, नितीन पवार, पवन कदम आदींसह अनेकजण हजर होते.