Breaking News

अश्‍लिल सीडी विक्री करणार्‍याला अटक

बुलडाणा, दि. 22, सप्टेंबर - येथील गांधी चौकात हातगाडीवर अश्‍लिल चित्रपटाच्या व बनावट सीडी विकणार्‍या अशोक कन्हैय्यालाल कपुर याचे जवळुन पोलिसांनी  4 लाख 7 हजार 150 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे. 
गांधी चौकात अशोक कन्हैयालाल कपुर (65) रा. सुटाळपुरा हा इसम हातगाडीवर अश्‍लिल चित्रपटाच्या बनावट सीडी संगणकाच्या सहाय्याने तयार करुन विक्री  करीत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांनी 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजता छापा मारुन हातगाडीवरुन सुमारे 83 83  हजार 700 रुपयाच्या सीडी जप्त केल्या. तसेच कपुर यांच्या घरी छापा मारुन 3 लाख 23 हजार 450 रुपये किंमतीचे संगणक व 12 हजार 71 सीडी असा एकुण  4 लाख 7 हजार 150 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी एपीआय मनोज केदारे यांनी शहर पोस्टेला दिलेल्या फियार्दीवरुन आरोपी अशोक कपुर विरुध्द भादंवि कलम 51,52 अ,63, 64, 68 (अ) कॉपीराईट  अँक्ट आरडब्ल्यु 292, कलम 4 अधिनियम 1968 नुसार गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.