Breaking News

मनीष पांडेचा अफलातून झेल


इंदूर, दि. 25, सप्टेंबर - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत मनीष पांडेच्या बॅटने तर अजून कमाल दाखवलेली नाही. मात्र त्याने तिसर्‍या वन डेत ज्या पद्धतीने  क्षेत्ररक्षण केलं त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली.
मनीष पांडेने हँड्सकॉम्बचा घेतलेला झेल पाहून मैदानातील सर्व प्रेक्षकही आश्‍चर्यचकित झाले. हा झेल पाहण्यासाठी उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक जागेवर उठून उभे  राहिले. जसप्रीत बुमराच्या षटकात हँड्सकॉम्ब फलंदाजी करत होता. त्याने मारलेला शॉट सीमारेषेच्या बाहेर जाणार होता. मात्र मनीष पांडेने अगोदर चेंडू अडवून तो  बाहेर फेकला आणि पुन्हा झेल घेतला.