Breaking News

हवाई दलाच्या लढाऊ विमानांची निर्मिती अदाणी समूह करणार

नवी दिल्ली, दि. 01, सप्टेंबर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेअंतर्गत हवाई दलाच्या लढाऊ विमानांची निर्मिती अदाणी समुहाकडून करण्यात  येणार आहे. त्या साठी अदाणी समूह स्वीडनमधील साब या कंपनीशी भागीदारी करणार आहे. यापूर्वी अदाणी समुहाकडून अमेरिकेतील लॉकहिड मॉर्टिन या कंपनीसह  लढाऊ विमानांसाठी फायटर जेट तयार करण्याचा करार करण्यात आला आहे.
भारताच्या नव्या भागीदारी योजनेअंतर्गत विमानांची निर्मिती करण्यासाठी अदाणी आणि साब या कंपन्यांनी भागीदारी केल्याचे ‘फिक्की’चे सल्लागार रतन श्रीवास्तव  यांनी सांगितले. या भागीदारीची अधिकृत घोषणा शुक्रवारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.