Breaking News

जत तालुक्यातील जवान अजित काशीद शहीद शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार

सांगली, दि. 27, सप्टेंबर - डोकलाम सेपुक येथील वाहन अपघातात ठार झालेल्या जवान अजित नारायण काशीद यांच्यावर उद्या बुधवार दि. 27 सप्टेंबर रोजी  त्यांच्या जन्मगावी जत तालुक्यातील निगडी खुर्द येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अजित काशीद यांचे पार्थिव बागडोगरा येथून विमानाने बुधवार दि. 27 सप्टेंबर रोजी त्यांच्या मुळगावी निगडी खुर्द येथे आणण्यात येणार आहे, अशी माहिती सांगली  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी कॅप्टन सुनील गोडबोले यांनी दिली. शहीद जवान अजित काशीद युनिट 121 इिंजिनअर रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. गत  आठवड्यात दि. 17 सप्टेंबर रोजी सैन्य वाहनाच्या अपघातात जखमी झाल्यामुळे अजित काशीद यांच्यावर लष्कराच्या रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार  सुरू असतानाच सोमवार दि. 25 सप्टेंबर रोजी त्यांचे निधन झाले. अजित काशीद यांना शहीद घोषित करण्यात आले.