Breaking News

मायक्रो फायनान्सची बँक खाती सील, संचालक-कर्मचार्‍यांची मालमत्ता जप्त

सोलापूर, दि. 13, सप्टेंबर - मायक्रोफायनान्स संचालकांकडून 260 पेक्षा अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी चेंबरच्या अ‍ॅक्सिस बँकेतील कोटी 51  लाख रुपये जप्त करून बँक खाते सील केले आहेत. याशिवास कर्मचारी संचालक यांची मालमत्ता सील करीत मालमत्तेचे हस्तांतरण होऊ नये, यासाठी उपविभागीय  अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. संचालकांच्या मालमत्ता सील करण्याची कारवाई अंतिम टप्प्यात आहे. यापुढील काळात संचालकांच्या मालमत्तेचे हस्तांतरण वा  खरेदी-विक्री व्यवहार करता येणार नाहीत. मायक्रो फायनान्स कंपनीने सोलापूर शहरातील ठेवीदारांकडून कोटी रुपयांहून अधिक पैसे गुंतवणूक स्वरूपात जमा करून  घेतले. मात्र ही रक्कम मुदत पूर्ण झाल्यानंतर परत देणे अपेक्षित होते. पैसे परत देण्याबाबत टाळाटाळ होत असल्याने शहरातील 260 पेक्षा अधिक गुंतवणूकदारांनी  पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी याचा तपास करून संचालक कर्मचारी यांना अटक करून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला आहे.