Breaking News

मोहटादेवी येथे घटस्थापना उत्साहात

अहमदनगर, दि. 22, सप्टेंबर - जगदंबा माता की जय, आई राजा उदो-उदो असा शक्तीचा जयघोष करीत मोहटादेवी गडावर जिल्हा न्यायाधीश तथा देवस्थान  समितीच्या अध्यक्षा सुवर्णा केवले यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी घटस्थापना करण्यात आली. जिल्हा उपवन सरंक्षक ए.लक्ष्मी व देवस्थानचे विश्‍वस्त यावेळी उपस्थित  होते.  मोहटादेवीच्या सुवर्ण मुखवटा व मुकुट आणि अलंकाराची मोहटा गावात सकाळी दहा वाजता विधीवत पुजा करण्यात आली. तेथून एकनाथ टाक या  सेवेकरयांनी पायी चालत डोक्यावर घेवुन देवीचा मुखवटा गडावर पालखी मार्गाने मिरवणुकीने आणला.यावेळी विश्‍वस्त व ग्रामस्थ, महीला भाविक, रेणुकामाता  विद्यालयाच्या विद्यार्थ्यीनी व विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. मुलींच्या लेझीम पथकाने मिरवणुकीत चांगलाच रंग भरला.त्यानंतर देवस्थानच्या पुजार्‍यांनी  मोहटादेवीची विधीवत पुजा केली.