Breaking News

चेंबूरमध्ये तलावात सांडपाणी सोडल्यामुळे तलाव दूषित

मुंबई, दि. 26, सप्टेंबर - चेंबूरमधील आरसीएफ परिसरात असलेल्या तलावात महापालिकेने सांडपाण्यामुळे संपूर्ण तलाव दूषित झाला आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये  संतापाची भावना असून संबंधित पालिका अधिकार्‍यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रहिवासी केली आहे.
चेंबूरमध्ये गणपती आणि गौरी विसर्जनासाठी आशीष टॉकीज परिसरात हा एकमेव तलाव आहे. या तलावाचा ताबा आरसीएफ कंपनीकडे आहे. तसेच या तलावामध्ये  वाशी नाका, चेंबूर कॉलनी, वाशी गाव आणि संपूर्ण आरसीएफ परिसरातील गणपतींचे विसर्जन होते. गणपती विसर्जनाच्या कालावधीत या तलावाची देखभाल पालिका  करते. मात्र तलावाकडे पालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
तलावाच्या सर्वच भिंती भग्नावस्थेत आहेत. त्यातच गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आरसीएफ वसाहत येथून येणारे सांडपाणी पालिका मुख्य नाल्यात न सोडता या  तलावामध्ये सोडत आहे. त्यामुळे या तलावाचे पाणी दूषित झाले असून परिसरात मोठया प्रमाणात दुर्गंधीही पसरली आहे. गणपती विसर्जनानंतर तलाव अधिकच  प्रदूषित झाला. त्यामुळे तलावातील मासे आणि इतर जीव-जंतू आदी जैववैविध्याला धोका निर्माण झाला आहे.