Breaking News

गणेशोत्सव पर्यावरण पुरक व्हावा

अहमदनगर, दि. 02, सप्टेंबर - गणेशोत्सव सार्वजनिक करण्यामागे लोकमान्य टिळकांचा हेतु असा होता की, त्यातुन समाजप्रबोधन व समाजहिताची कामे व्हावित.पण आज याच्या उलट चित्र दिसत आहे. माझ्यामते मूर्ती या शाडूच्या किवा तुरटीच्या असाव्यात.म्हणजेच विसर्जन मिरवनुक पर्यावरणपुरक हइल.गणपती समर चित्रपटामधिल गिते लावण्यापेक्षा समाजप्रबोधनपर माहिती ऐकवली तर ते अधिकच उचित ठरेल. गणेशोत्सवाचे मंडप हे व्यसनांचे अड्डे बनत आहेत.जुगार पत्ते याने बुदधिदैवतेला वाईट वाटत असेल. एक गाव एक गणपती शक्य नसेल तर एक वार्ड एक गणपती केला पाहिजे. म्हनजे समाजप्रबोधनासाठी तरुनांची फ़ळी तयार होईल. जमलेल्या वर्गणिमधून गरजूंचे शिक्षण होईल, झोपडपट्टीयांचे प्रश्ऩ मार्गी लागतील. सध्या देवांच्या उत्सवाचा उपयोग राजकिय प्रतिष्ठा वाढवण्यासाठी केला जात. त्यात श्रद्धैचे व मानुसकिची झलकही दिसत नाही. जबरदस्तीने वर्गणी जमा केली जाते. घाणिचे साम्राज्य पसरवले जाते. हे सर्व थांबवल पाहिजे. माझ्या शालेय जिवनामध्ये गणपती मिरवणुक पारंपारीक पद्धतीने काढली जात असे. मिरवनुकिमध्ये ढोल,ताशे,लेझिम, ढाल तलवार आदिंची प्रात्यकक्षिके व्हायची. त्या मधुन नागरिकांचे नेतृत्वगुण वाढीस लागत. पण आज राजकिय गट्बाजीमुळे गुंड प्रवृत्ती वाढीस लागत आहे. डि. जे. वाजवून पर्यावरण दुषित करण्यापेक्शा चांगले कार्य करावे व समाजहितकर गणेशोत्सव करावा.
अंजली देवकर-वल्लाकट्टी शिवछत्रपती पुरस्कार विजेती.