Breaking News

चंद्रकांत पटेल हा वायकरांचा सहकारी; निरुपम यांचा आरोप

मुंबई, दि. 25, सप्टेंबर - नोटा रद्दच्या काळात 84 कोटी रूपये जमा केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला व्यापारी चंद्रकांत पटेल हा शिवसेनेचे नेते व राज्यमंत्री  रवींद्र वायकर यांचा सहकारी आहे, असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज केला. या प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने वायकर यांची चौकशी  करावी, अशी मागणीही निरुपम यांनी केली आहे.
नोटा रद्दच्या काळात 84 कोटी रूपये जमा केल्याप्रकरणी चंद्रकांत पटेल या व्यापार्‍याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू  केला आहे. चंद्रकांत पटेल हा सोन्याचा व्यापारी आहे. त्याला 27 सप्टेंबरपर्यंत सक्तवसुली संचलनालयाच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. एवढी मोठी रक्कम  त्यांच्या खात्यात एकाच वेळी जमा कशी झाली याचा पुरावा पटेल देऊ शकला नाही. सक्तवसुली संचलनालयाने काल चंद्रकांत पटेल याला ताब्यात घेऊन  न्यायालयात हजर केले.