Breaking News

पारोळा शहरातील बालाजीला अडीच लाखांचा मुकुट

जळगाव, दि. 25, सप्टेंबर - पारोळा शहरातील सराफ सुवर्णकार असोसिएशनकडून येथील श्री बालाजी महाराज मंदिराला अडीच लाखांचा रत्नजडीत सुवर्ण मुकुट  प्रदान करण्यात आला. शहादा येथील कारागीर विशाल सराफ, किशोर सोनार यांनी 60 ग्रॅम सोने, रत्नांनी हा मुकुट मढवलेला आहे.
सराफ असोसिएशनचे माजी अध्यक्ष योगेश सोनार मनीषा सोनार यांनी सप्निक पूजा केली. संस्थेचे प्रमुख विश्‍वस्त श्रीकांत शिंपी, सराफ असोसिएशनचे नूतन अध्यक्ष  प्रभाकर भालेराव, अनिल टोळकर, नगरसेवक नितीन सोनार, छोटू जडे, दामू सोनार, सुनील भालेराव, महावीर जैन, मनीष जैन, विजय सराफ, नितीन भारोटे,  गणेश थोरात, छोटू वाणी, आशिष वाणी, मयूर मालपुरे, प्रवीण दाणेज, संकेत दाणेज, अमोल दाणेज, अरुण दाणेज (भिवंडी), कारागीर अनिल महाजन (घाटी),  अशोक सातारकर उपस्थित होते. संजय पाठक यांनी मंत्रोच्चार अभिषेक करून श्री बालाजी महाराजांना मुकूट प्रदान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील भालेराव  यांनी तर आभार श्रीकांत शिंपी यांनी मानले. बालाजीभक्त उपस्थित होते.