Breaking News

नोटा बदलण्यासाठी अमेरिकेतून भारतात यावे लागले - रघुराम राजन

नवी दिल्ली, दि. 09, सप्टेंबर - केंद्र सरकारकडून असा अकस्मात नोटाबंदीचा निर्णय घेतला जाईल याबाबत काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे नोटा बदलण्यासाठी मला खास अमेरिकेतून भारतात यावे लागले होते, असे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितले. ’आय डू वॉट आय डू’ या आपल्या पुस्तकासंदर्भात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले की, गव्हर्नरपद सोडल्यानंतर मी पुन्हा अमेरिकेला गेलो होतो. यावेळी माझ्याकडे काही भारतीय नोटा होत्या. या निर्णयाबाबत कळताच मला नोटा बदलवून घेण्यासाठी भारतात यावे लागले होते. नोटांबदीला माझा विरोध होता. नोटाबंदीमुळे होणारे आर्थिक नुकसान दीर्घकालीन फायद्यापेक्षा खूप मोठे असेल, असे त्यांनी नमूद केले.