Breaking News

प्रताप पाटील चिखलीकर यांचा जिल्हा बँक अध्यक्षपदाचा राजीनामा

नांदेड, दि. 26, सप्टेंबर -  नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र हा राजीनामा देण्यामागे राजकीय कारण नसून कॉँग्रेस  विरोधी आघाडीत ठरलेल्या करारांचा भाग आहे. जिल्हा बँकेच्या पुढील अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचा संचालक निवडला जाणार आहे.
नांदेड बँकेत कॉँग्रेस विरोधात भाजप, राष्ट्रवादी कॉँग्रेस व शिवसेना यांनी आघाडी करून निवडणूक जिंकली. यात भाजपचे 4, राष्ट्रवादीचे 4, शिवसेनेचे 3 व कॉँग्रेसचे  3 संचालक निवडून आले. कॉँग्रेस विरोधी आघाडीला सत्ता मिळाल्यानंतर आघाडीने बँकेच्या अध्यक्षपदी दरवर्षी एकेका पक्षाला संधी देण्याचा करार केला होता.  राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यानंतर आता भाजपकडे अध्यक्षपद जाणार आहे. त्या मुळे चिखलीकर यांनी राजीनामा दिला आहे.