Breaking News

मुंबईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला

मुंबई, दि. 26, सप्टेंबर -  शहरातील उच्चभ्रू परिसरातील नेपियन सी मार्गावरील चार मजली इमारतीचा काही भाग आज सायंकाळी कोसळला. मात्र अग्नीशमन  दलाच्या तत्परतेने जीवितहानी झाली नाही. नेपियन सी मार्गावरील हझिझ हबिब असे या इमारतीचे नाव असून आज इमारतीच्या दुस-या व तिस-या मजल्याचा  काही भाग कोसळला. मात्र अग्नीशमदन दलाने घेतलेल्या खबरदारीमुळे यामध्ये कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.