Breaking News

भारत आणि ऑस्ट्रेलिया चौथा एकदिवसीय सामना आज

बंगळुरु, दि. 28, सप्टेंबर - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा वन डे सामना आज बंगऴुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेऴवण्यात येणार आहे. पहिल्या  तीन वन डेत ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवल्यानंतर विराट कोहलीची टीम इंडिया मालिकेतील चौथ्या विजयासाठी सज्ज झाली आहे. भारताने आतापर्यंत सलग नऊ  विजय मिळवले आहेत, मात्र आजचा सामना जिंकून सलग दहा सामने जिंकण्याचा विक्रम करण्याची संधी कोहली ब्रिगेडला आहे.
इंदूरच्या तिसर्‍या वन डेत भारतानं कांगारुंवर 5 विकेट्सनी विजय साजरा केला. या विजयाबरोबरच टीम इंडियानं या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेत 5  सामन्यांची ही मालिका खिशात घातली आहे. त्यामुळे उर्वरीत दोन्ही सामने जिंकून श्रीलंकेपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचाही व्हाइटवॉश करण्याचं विराट आणि त्याच्या  शिलेदारांचं लक्ष्य राहील.
मालिका खिशात टाकल्यानं टीम इंडिया आता संघात काही बदल नक्कीच करु शकते. त्यामुळे आतापर्यंत ज्या खेळाडूंना बाहेर बसवण्यात आलं होतं. त्यांना संधी  मिळू शकते. या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपला ठसा उमटवला आहे. भुवनेश्‍वर कुमार, बुमरा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल आणि  हार्दिक पांड्या यांनी आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन सामन्यात यापैकी कुणाला तरी आराम देऊन इतर गोलंदाजांना संधी  मिळण्याची शक्यता आहे.