Breaking News

महिला क्रिकेटर मिताली राजवर चित्रपट

मुंबई, दि. 28, सप्टेंबर - भारतीय महिला क्रिकेट ब्रिगेडच्या शिलेदाराचं आयुष्य लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मिताली राजवर बॉलिवूडपट  काढण्याची घोषणा व्हायाकॉम 18 मोशन पिक्चर्सने केली आहे. मितालीची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
धोनी, मिल्खा सिंग, सायना नेहवाल, मेरी कोम, खली यासारख्या क्रीडापटूंवर आतापर्यंत चित्रपट निघाले आहेत. लवकरच 1983 च्या क्रिकेट विश्‍वचषकावर  आधारित चित्रपटाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे धोनी, कपिल देव यांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिताली राजला मिळाला आहे. ‘माझ्या आयुष्यावर चित्रपट  निघणार असल्याने मला अत्यंत आनंद होत आहे. या चित्रपटातून अनेक तरुणींना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळेल’ अशी अपेक्षा मितालीने व्यक्त केली  आहे. मिताली राज ही महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी क्रीडापटू ठरली आहे. वनडेमध्ये सहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारी एकमेव  महिला क्रिकेटर आहे. वनडेमध्ये सलग सातवेळा अर्धशतक करणारी पहिलीच क्रिकेटपटू आहे.