Breaking News

यशापर्यंत पोहचण्याचे कोणतेच शॉटकर्ट नाही : बि.एन.नलवाडे

नेहरू युवा केंद्राच्या कार्यक्रमात केले तरुणांना मार्गदर्शन

बुलडाणा, दि. 28, सप्टेंबर - भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र संगठन ,बुलडाणा चे जिल्हा युवा समन्वयक डॉ. दत्ता देशमुख  यांच्या मार्गदर्शना खाली दिनांक 27 सप्टेम्बर रोजी देऊळगांव राजा येथे न.प टाउन हॉल मधे पडोस युवा सांसद कार्यक्रम घेण्यात आला.या निमीत्त बोलतांना  पोलीस उपविभागीय अधिकारी बि. एन. नलवाडे यांनी युवकांना मार्गदर्शन करत सांगितले जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर मेहनत करण्या शिंवाय पर्याय नाही व  यशाचे कोणतेच शॉर्टकट नसते असे ही हे यावेळी बोलले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री.के.जे पवार तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.बी.एन  नलवाडे व सूर्योदय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक श्री.प्रल्हाद देशमुख यांनी उपस्थिती लावली व् प्रमुख पाहुने म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक  राजेश घाटे,मोरे मैडम व टकले मैडम उपस्थित होते. कार्यक्रमात युवकांना निर्माण होणार्‍या  विविध सामाजिक ,आर्थिक व गावात युवकांच्या विकासासाठी  निर्माण  होणार्‍या समस्या इत्यादि विषयावर चर्चा करण्यासाठी नेहरू युवा केंद्र बुलडाणा मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने प्राचार्य  पवार,प्रल्हाद देशमुख, यानी ही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक नेहरू युवा केंद्र तालुका समन्वयक ज्ञानेश्‍वर शिंगणे यांनी तर सूत्रसंचालन शरद  काकड़े सरानी केले तर आभार प्रदर्शन नेहरू युवा केंद्राचे  तालुका समन्वयक सचिन नागरे यांनी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतीतेसाठी सूर्योदय स्पर्धा परीक्षा  केंद्राचे सम्पूर्ण शिक्षक वृंद व् विद्यार्थी व् तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था व् नगर परिषद् देऊळगांव राजा व् युवा समाजसेवक सूरज हनुमंते तसेच बबन शिंदे  सर,अनिल पडुळकर व् ऋशीकेश शिंगणे यांनी सहकार्य केले.