Breaking News

मिसा भारतींची संपत्ती जप्त करण्याचे आयकर विभागाचे अंतिम आदेश

नवी दिल्ली, दि. 12, सप्टेंबर - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची कन्या मिसा भारती त्यांच्या पतीची संपत्ती जप्त करण्याचे अंतिम आदेश आयकर  विभागाने दिले आहेत. मिसा यांच्या नावे 165 कोटींची संपत्ती आहे. यापूर्वी सक्तवसूली संचालनालयाने मिसा व त्यांच्या पतीचे फार्म हाऊस जप्त केले होते. हे फार्म  हाऊस मेसर्स मिशॅल पॅकर्स अँन्ड प्रिंटर्स प्रायवेट लिमिटेड या कंपनीच्या नावे होते. 2009साली 1.2 कोटींना त्यांनी हे फार्म हाऊस विकत घेतले होते.