Breaking News

गावठी दारुच्या भट्ट्यांवर छापे

बुलडाणा, दि. 28, सप्टेंबर - तालुक्यात अवैध हात भट्टीच्या सहाय्याने मोहा व सडवाच्या माध्यमातून तयार करण्यात येणार्‍या गावठी दारूच्या भट्टयांवर दि.24  सप्टेंबर रोजी बोराखेडी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने वेगवेगळ्या चार ते पाच ठिकाणी छापे टाकुन 52 हजार 725 रुपयाची हातभट्टीची दारू व मुद्देमाल  जप्त क रण्यात आला आहे.  बोराखेडी पोलिस स्टेशन अंतर्गत पोलिस निरीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक देवाजी बोर्डे व त्याचे  सहकारी पोहेकॉ रेड्डी, मोरे, अरक, वाघ यांनी तालुक्यातील खैरखेड मोहगांव येथे गावठी दारूचे व्यवसाय करणार्‍या चार ठिकाणी छापा मारुन मुद्दे माल जप्त केला  आहे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तालुक्यातील कोथळी येथे ही हातभट्ट अड्या छापा टाकून मुद्दे माल जप्त केला आहे.  पोलिसांनी आरोपी दादाराव पंडित  गवई, सिद्धार्थ बुधाजी इंगळे,गौतम बुधाजी इंगळे, सुशीला भगवान धुरंधर सर्व राहणार खैरखेड व विनोद रामभाऊ शिरकरे रा. कोथळी अशा एकुण पाच आरोपी  विरुद्ध कलम 65 क, फ, ड, महाराष्ट्र पोलिस अँक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.