Breaking News

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ केला जप्त

औरंगाबाद, दि. 30, सप्टेंबर -  स्वस्त धान्य दुकानातील साडेनऊ क्विंटल तांदुळ काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी लासुरस्टेशनला नेत असताना गंगापूर  पोलिसांनी जप्त केला. 26 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेदरम्यान गंगापूर- लासुरस्टेशन रोडवरुन स्वस्त धान्य दुकानातील नऊ क्विंटल 50 किलळ अपे रिक्षा क्र.  एम20 डीई 9472 मधून घेऊन जात असल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली. यावरून योगेश हारणे यांनी मालुंजा जवळ रिक्षा पकडली व याची माहीती  पुरवठा विभागाला दिली . या माहितीवरून पुरवठा विभागाने तलाठी शिंदे व शेख यांना पाठवुन पंचनामा केला परंतु या घटनेची माहीती पोलीसांनी तहसिलदार यांना  लेखी स्वरुपात देवुन तुम्ही खात्री करुन गुन्हा दाखल करण्याचे पत्र दिले होते. परंतु या विषयी पुरवठा विभागाने कुठलीही दखल व तपासनी न करता मुद्देमाल व  रिक्षा पुरवठा विभागाच्या गोडावुनला जमा केली. रिक्षा चालक व त्याच्या साथीदाराला काहीही कारवाई न करता तसेच सोडुन दिल्याने शहरात उलटसुलट चर्चेला  उधाण आले आहे.