Breaking News

चव्हाण पवारांनतरचा द्रष्टा नेता - देवेंद्र फडणवीस

दि. 26, सप्टेंबर - दगड धोंड्यांचा संत महात्म्यांचा देश असलेल्या महाराष्ट्राला विचारांचा आणि कृतीचा प्रगल्भ वारसा आहे,बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे  संत वचन या वारशाची पावलोपावली आठवण करून देते. या मातीच्या कर्तृत्वमय सुंगंधाने राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर आपले अस्तित्व सिध्द केले आहे.
अनेक युग पुरूष, महापुरूषांच्या जन्माने  कर्माने पावन झालेल्या या भुमीत राजकीय आणि सामाजिक समतोल राखत विकासाला गवसणी घालण्याचे कौशल्या फार  थोड्या मंडळींना आत्मसात करता आले. या मंडळींनीमध्ये प्राधान्याने नाव घ्यायची म्हटली तर आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना अग्रक्रम  द्यावा लागेल. पाठोपाठ त्यांचेच मानसपुञ म्हणवणारे शरद पवार यांनाही या पंक्तीत स्थान मिळते.
यशवंतराव चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजकारण आणि राजकारणात शिखर गाठणारे अजात शञू मुत्सूद्दी नेते म्हणून शरद पवार यांचे नाव घेतले जाते.  अगदी काल परवा पर्यंत म्हणजे आघाडी सरकार सत्तेवरून पाय उतार होईपर्यंत शरद यांच्या राजकीय आणि सामाजिक मुत्सूदेगीरी करणारा अन्य नेता महाराष्ट्रातच  काय देशात अन्य कुणी शोधून सापडणार नाही अशी ख्याती होती. तथापी लोकशाही आघाडीची सत्ता गेल्यानंतर चव्हाण पवारांच्या पंक्तीत आणखी तिसरं नाव  जोडलं गेलं आहे... देवेंद्र फडणवीस.
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय कालखंड वेगळा असला तरी शरद पवारांचा उत्तरार्ध सुरू झाला असतांना देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय  कारकिर्दीला आलेला बहर हा कालखंड एकच आहे. या काळात महाराष्ट्राला मिळालेले हे नवे नेतृत्व म्हणूनच दखलपाञ ठरले आहे.
शरद पवार आणि देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वगुणांची थेट तुलना करायची म्हटले तर विद्यमान राजकीय परिस्थितीत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंञी म्हणून  शरद पवार यांच्या पेक्षा काकणभर सरस ठरल्याचे मान्य करावे लागते.
अंधपणे भक्ती करून नामजप करणार्‍या मंडळींनी कितीही नकारघंटा वाजवली तरी गेल्या पाच सात वर्षाची राजकीय सामाजिक परिस्थिती हाताळण्यात शरद पवारांना  आलेल्या अपयशाचा कौशल्यपुर्ण वापर करून घेण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले आहेत.
प्रतिकुल परिस्थितीत हतबल किंवा अस्वस्थ न होता, परिस्थितीला शरण आणण्याचे कसब त्यांनी अंगी बाणले आहे. करणी आणि कथनी मध्ये फरक करणारे नेतृत्व  कालांतराने उघडे पडते. पन्नास वर्ष संसदीय राजकारणात राहीलेले शरद पवार आणि निम्मे वय असलेले देवेंद्र फडणवीस. गुरू चेल्याचे म्हटलं तर नातं, गुरूची विद्या  गुरूवर कशी पलटवार करायची याचे धडे पवार यांच्या राजकीय वाटचालीच्या निरिक्षणातून फडणवीस यांनी घेतले असावेत कदाचित. पण ही वस्तुस्थिती आहे की  एकलव्याच्या भुमिकेत राहून फडणवीस यांनी निदान महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्यापुढे एक पाऊल टाकले आहे.
तटस्थपणे केलेले सुक्ष्म निरिक्षण यशाचा मार्ग खुला करते, यशाच्या वाटेत येणारे खाच खळगे, प्रतिस्पर्ध्यांकडून ऐनवेळी होणारी चाल या सार्‍या गोष्टींचा अभ्यास  फडणवीस यांनी विरोधी पक्षात असतांना पुर्ण केला, त्याचा फायदा आज महाराष्ट्राचा कारभार चालवितांना त्यांना होतो आहे.
राजकीय विचारसरणीच्या पातळीवर यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे मार्ग भलेही वेगळे असतील पण राजकीय सामाजिक आणीबाणीला  कसे हाताळायाचे याबाबतीत फडणवीस उभयंतापेक्षा तसुभरही कमी नाही किंबहूना काकणभर सरस आहेत. हे म्हणणे अजिबात अतिशोयोक्ती ठरणार नाही.
तात्पर्य इतकेच हा महाराष्ट्र उभय दोन नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांचेही नाव कायम स्मरणात ठेवील अशीच महाराष्ट्राच्या मुख्यमंञ्यांची वाटचाल आहे. देवेंद्र  फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र वेगळ्या उंचीवर पोहचेल यात शंका नाही. अर्थात देवेंद्र फडणवीस आज ज्या उंचीवर आहेत त्याला शरद पवार यांच्या  हातून जाणतेअजाणतेपणे घडलेल्या घोडचुका कारणीभुत आहेत का हेही वेळेअंती तपासून पहावे लागेल व त्याचाही परामर्श योग्यवेळी घ्यावाच लागेल. तुर्तास  महाराष्ट्राच्या वाटचालीत फडणवीस यांना भरघोस यश मिळो इतक्याच शुभेच्छा!