शस्त्रसंधीच्या उल्लंघनातील मृतांच्या नातेवाईकांना मिळणार 5 लाख रु.
श्रीनगर, दि. 12, सप्टेंबर - शस्त्रसंधीच्या उल्लंघनात ठार झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना एक लाखाऐवजी पाच लाख रु. मदत मिळणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज जाहीर केले. सीमारेषेवर शेजारील देशांकडून केल्या जाणा-या शस्त्रसंधी उल्लंघनात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तिंच्या नातेवाईकांना आतापर्यंत 1 लाखाची मदत दिली जात होती. मात्र आता ही मदतीची रक्कम वाढवण्यात आली आहे. याशिवाय, अशा घटनांत 50 टक्के अपंगत्व आलेल्या आलेल्यांनादेखील 5 लाखांची मदत देण्यात येणार असल्याचेही राजनाथ सिंग यांनी सांगितले.
सीमेलगतच्या भागात राहणारे नागरिक ही प्रत्येक देशाची ताकद असते. त्यावर देशाचे सामर्थ्य ठरते. सध्याचा भारत हा पूर्वीसारखा राहिलेला नाही. त्यामुळे कोणीही भारताला दुर्बल समजू नये, असेही राजनाथ सिंग यावेळी म्हणाले.