Breaking News

पूर परिस्थितीचा महापौर आणि आयुक्तांचा पाहणी दौरा

पुणे, दि. 21, सप्टेंबर - सोमवारपासून पुणे शहर व परिसरात संततधार पडत असलेल्या पावसाचा जोर वाढल्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा मोठ्या  प्रमाणावर विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे सिंहगड रोड परिसरातील आनंदनगर भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्याठिकाणी आज महापौर मुक्ता टिळक  आणि मनपा आयुक्त कुणाल कुमार यांनी अधिकार्‍यांसमवेत पाहणी करुन महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणाना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नागरिकांना  सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.