Breaking News

खडकवासला धरणातून 23 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

पुणे, दि. 21, सप्टेंबर - खडवासला धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे धरणातून 23 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. खडकवासला धरणातून 23 हजार  क्युसेक पाणी सोडल्याने सिंहगड रस्ता परिसरातील काही सोसायट्या मध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून  पोलीस, महापालिका कर्मचारी या भागात तैनात करण्यात येत आहेत. शहराला पाणी पुरवठा करणार्‍या ध्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे शहराला  पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरणसाखळीतील खडकवासला धरणासह पानशेत आणि वरसगाव ही तीन्ही धरणे शंभर टक्के भरलेली आहेत. त्यामुळे  खडकवासला धरणातून रात्री 11 वाजल्यापासून चार हजार क्यूसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. मात्र सकाळ पासून पावसाचा जोर काहीसा कमी  झाल्याने हा विसर्ग सकाळी 10 नंतर 14000 क्यूसेक्सने घटवणार असल्याची माहिती जलसंपदा विभागा कडून देण्यात आली आहे.सध्या सर्वत्रच पाऊस सुरू आहे.  त्यामुळे धरणांतील पाणीपातळी वाढत आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या चारपैकी खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही धरणे पूर्ण भरली आहेत.  पावसाचा जोर वाढल्यास हा विसर्ग वाढवण्यात येईल. मात्र तूर्तास पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग 14000 ने कमी करण्यात आला आहे . दरम्यान,  महापालिका, जिल्हा प्रशासनालाही पाणी सोडण्याबाबत कल्पना देण्यात अली असून प्रशासनच्या यंत्रणा सज्ज झाली आहे.